माणूस

जन्माला आला तो वंशाचा दिवा झाला पहिल्याच दिवशी त्याला जबाबदारीचा शिक्का लागला थोडा मोठा झाला तो भावंडांचा भाऊ झाला आपल्या खेळण्यातला अर्धा हिस्सा वाटू लागला वयात आला तो बहिणीचा रक्षक झाला रक्षाबंधनाला तर स्वतःची मनिबॅंक ही फोडू लागला कॉलेजला गेला तो मैत्रिणींचा मित्र झाला तिच्या सुख दुःखाचा आपसूक वाटेकरी बनला लग्नामध्ये त्याच्या तो नवरदेव झाला […]

‘ वाढदिवस मास्टर ब्लास्टरचा‘

काय फरक होता त्याच्या आणि आपल्या कामात ? क्रिकेट हा खेळ त्याचे काम होते. त्यातून त्याला पैसे मिळायचे, प्रसिध्दी मिळाली, आज तो जो काही आहे (देव) ते अस्तित्व प्राप्त झाले; आम्ही काम धंदा, नोकरी, व्यवसाय अगदी शेती करतो.. काहींना त्यातून त्याला मिळालेली प्रसिध्दी मिळाली, अस्तित्व प्राप्त झाले. मग काय फरक तो ? तो क्रिकेट हे […]

” सिंधुदुर्ग “

गोव्यात विमान उतरायला लागले तसे तिथल्या हिरवाईने डोळ्यांचे पारणे फिटले. नारळ,पोफळी,सुपारीच्या बागा फुलांनी झाडा वेलींनी नटलेल्या छोट्या छोट्या वाड्या, आसपास झुलणारा अथांग सागर. मनाचे ताण अचानक सैल झाले.गोव्याला मुक्काम नव्हता. माझे गंतव्यस्थान होते सिंधुदुर्ग. कोकणातला सृष्टीसौंदर्याने श्रीमंत असा हा भाग एक नाही अनेक जलदुर्ग याचे वैभव आहे. गोव्याची हद्द ओलांडून महाराष्ट्राच्या तळकोकणात प्रवेश केला. नागमोडी […]

भाषेचा आनंद…

नवे कपडे घातल्यावर आनंद होत नाही असा माणूस आढळून येणार नाही. शेजारी-पाजारीही त्याचे कौतुक करतात. अरे वा ! आज नवीन कपडे, काही विशेष ? अशी कौतुकाने चौकशी होते. नवीन कपडे घातलेला आणि त्याचं कौतुक करणारा दोघानांही आनंद झालेला असतो. आपण जेव्हा भाषेचा अचूक वापर करतो तेव्हाही आपल्याला असाच आनंद झाला पाहिजे. प्रसिद्ध लेखक श्याम मनोहर […]

एक विचार पुनर्भेटीचा-

प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात काही व्यक्तींना, काही आठवणींना हृदयाच्या गाभार्‍यात जपून ठेवतो. काही वेळेला आपल्या सहवासात आलेल्या अशा व्यक्ती काही कारणांमुळे आथवा परिस्थितीमुळे आपल्यापासून दुरावतात. कधी एखाद्याचा अकाली मृत्यु घडतो तर कधी काळाच्या ओघात आपण एकमेकांपासून दूर होतो मी असाच सहज बसलो असताना माझ्या मनात एक विचार आला की, समजा आपल्याला कोणी विचारले की तुझ्या […]

पिंपळ

फांद्यांची अडचण होते म्हणून मारझोड करुन कुणीतरी त्याच्या फांद्याच तोडल्या त्या विशाल वृक्षाची छाया हरवली, पक्ष्या–पांथस्थांची सावलीच गेली सगळेच गेले सोडून त्याला तो पुरता खचला जुनी पाने गळता गळता नवे कोंब उमलू लागले अल्लड गुलाबी रंग पानोपानी खुलू लागले बघता बघता तो पुन्हा तरारला घनदाट फांद्या घेऊन पुन्हा सजला पक्ष्या–पांथस्थांची पुन्हा सुरु झाली वर्दळ मलाही […]

“ विभाजन आईचे ”

एक आई सोडली तर तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे काहीही नाही आणि भावंडांमध्येही मी एकटाच. एकदा थकल्या आवाजात आई म्हणाली होती तुला एखादा भाऊ हवा होता म्हणजे जरा तुझा ताण हलका झाला असता बस्स इतकेच. मित्राकडे गेलो सहज भेटायला म्हणून त्याची आई कुठे दिसली नाही घरात सहज विचारले तर म्हणाला दादाकडे गेली आहे पुढच्या सहा महिन्यांसाठी […]